Breaking News

शिंदे-फडणवीस सरकार बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या सोडवतील -दुधे

पनवेल : वार्ताहर

सिडकोच्या अनेक समस्यांना या भागात विकास करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक कामे खोळंबली असून सद्याचे शिंदे-फडणवीस सरकार न्याय मिळून देतील व आमच्या समस्या सोडवतील, असा ठाम विश्वास पनवेल परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेले दुधे बिल्डर्सचे तुकाराम दुधे यांनी व्यक्त केला आहे.

सिडको क्षेत्रात काम करणार्‍या बांधकाम व्यवसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याबाबत वेळोवेळी सिडकोच्या संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन सुध्दा या समस्यांचे निराकरण होत नाही. सध्याच्या युतीच्या सरकारकडून आम्हाला पूर्ण अपेक्षा असून सिडको वसाहतीमध्ये काम करतेवेळी बांधकाम व्यावसायिकांना येणार्‍या समस्या हे सरकार जाणून घेईल. आमच्या समस्यांचे निराकरण करतील, असा ठाम विश्वास तुकाराम दुधे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला आहे. लवकरच संबंधित खात्यातील मंत्र्यांची भेट घेऊन आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडू असेही तुकाराम दुधे यांनी या वेळी सांगितले.

Check Also

जनहितासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नेहमीच पुढाकार -मंत्री गणेश नाईक

आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर संस्कारी असल्याचेही गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर …

Leave a Reply