Breaking News

शिंदे समर्थक रुपेश पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला

उरण ः रामप्रहर वृत्त

आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला झटका दिल्याचा राग मनात धरून अज्ञातांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थक रुपेश पाटील यांच्या उरण येथील कार्यालयावर भ्याड हल्ला करीत त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

एकनाथ शिंदे यांनी उठाव केला व ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यानंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिवसेनेचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीदेखील शिंदे गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. युवा सेना माजी रायगड जिल्हा सचिव, राष्ट्रीय सहसचिव तथा विस्तारक रुपेश पाटील यांनीही राज्य कार्यकारिणी, पदाधिकार्‍यांसमवेत शिंदे गटाला पाठिंबा देऊन आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला झटका दिला. याचाच राग मनात धरून अज्ञातांनी रुपेश पाटील यांच्या गाडीची तोडफोड केली व उरण येथील कार्यालयावर भ्याड हल्ला केला. याबाबत रुपेश पाटील यांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलीस संरक्षणदेखील पुरविण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply