Breaking News

‘मामा भाचे’ ठिकाणाचे सुशोभीकरण सुरु

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका क्षेत्रातील भिंगारी गावालगत असलेल्या मामा भाचे या ठिकाणाचे महापालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या कामाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 10) भूमिपूजन करण्यात आले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील भिंगारी गावाजवळील मामा भाचे या ठिकाणी दशपिंड विधी करण्यात येतो. त्यामुळे या ठिकाणाचे सुशोभीकरण व्हावे, अशी मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या माध्यमातून मामा भाचे या ठिकाणाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

भूमिपूजनावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, बालाराम चिखलेकर, विशाल म्हस्कर, रूपेश परदेशी, सचिन चिखलेकर, कृणाल म्हात्रे, काशिनाथ परदेशी, जगदिश परदेशी, संदेश परदेशी यांसह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कामासंदर्भात अधिक माहिती दिली.

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply