Breaking News

खासदार श्रीरंग बारणे यांचा उरणमध्ये झंझावाती प्रचार दौरा

आमदार महेश बालदी यांची उपस्थिती

उरण : वार्ताहर
मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी (दि. 27) उरण भेट दौरा आणि बाईक रॅलीचे आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला.
या रॅलीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश बालदी यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर, भाजपचे
शहराध्यक्ष कौशिक शाह, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, सरचिटणीस निर्मला घरत, शहराध्यक्ष संपूर्णा थळी, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाईक रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी खासदार बारणे यांचे स्वागत करण्यात आले, तर महिलांनी औक्षण केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply