Breaking News

कर्जतच्या वर्षा पर्यटनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नको

मागील 20 वर्षात कर्जत तालुका पर्यटन तालुका बनला आहे. या भागातील पावसाळी पर्यटन आणि त्यासाठी आयोजित केलेल्या वर्षा सहली या मुळे या तालुक्याचा व्यापार उदीम भरभराटीला आले होते. मात्र प्रशासनाचे अधिकारी आपली जबाबदारी टाळण्यासाठी कर्जतचे पर्यटन संपवू पाहत आहेत असे दिसून येत असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. अपघात होतात म्हणून वर्षासहली यांच्यासाठी कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठे यांच्या ठिकाणी जाण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केलं आहेत. दरम्यान यावर्षी जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी वर्षासहली यांचा हंगाम जोरात सुरु होता आणि फक्त कर्जत तालुक्याला जमावबंदी होती काय? असा प्रश्न आता सामान्य जनता उपस्थित करू लागली आहे. 

कर्जत तालुक्यातील निसर्ग सौदर्य यांचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक य्रेत असतात. मात्र धबधबे,धरणे,तलाव या ठिकाणी होणारे अपघात लक्षात घेऊन पावसाळी पर्यटनावर दरवर्षी बंदी घालण्यात येत असते. मागील दोन वर्षे कोरोना मुले लावलेल्या लॉक डाऊन नंतर आलेल्या पावसाळ्यात पावसाळी पर्यटनाचा आनन्द घेण्याचे प्लॅन सर्वांनी आखले जातात.पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत तालुक्यातील धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येत असतात. कर्जत तालुक्यातील अवसरे धरण, साळोख धरण, खांडस धरण, पाषाणे धरण, डोंगरपाडा धरण, पाली भूतिवली धरण, बेकरे कोल्हा धबधबा, कोमलवाडी धबधबा, बेडीसगाव धबधबा, टपालवाडी धबधबा, आनंदवाडी धबधबा, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, मोहिली धबधबा, वदप धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा, पळसदरी धरण व धबधबा, कोंढाणे लेणी-धरण-धबधबा, सोलनपाडा धरण-पाझर तलाव आदी ठिकाणी पर्यटनासाठी पावसाळयात पर्यटनासाठी येत असतात.

20वर्षांपूर्वी मुंबई आणि ठाणे परिसरातील मध्यमवर्गीय यांना कर्जतच्या निसर्गाने भुरळ घातली आणि त्यावेळी एवढी वाहने उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे 90 टक्के मध्यमवर्गीय हे उपनगरीय लोकल पकडून शनिवार आणि रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी कर्जत,नेरळ,भिवपुरी रोड आणि वांगणी येथील धबधबे,धरणे तसेच तलाव यांच्या ठिकाणी वर्ष सहली साठी येत होते.बहुतेक पर्यटक हे कर्जत तालुक्याच्या विविध भागात असलेल्या धबधबे यांच्या ठिकाणी पोहचायचे आणि निसर्गाचा आनंद घेऊन घरी परतायचे. त्यातून कर्जत तालुक्यातील धबधबे यांची माहिती प्रसिद्धी होऊ लागली आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन पावसाळ्यात भरभराटीला येऊ लागले. त्यात कर्जत तालुका पर्यटन तालुका म्हणून विकसित होत असताना पावसाळ्यातील चार महिने येथील पर्यटन आणखी खुलायचे आणि त्यामुळे कर्जत तालुका प्रसिद्धीच्या झोतात आला होता.त्यात पर्यटक येऊ लागल्याने त्या त्या धबधबा किंवा धारणे पाझर तलाव यांच्या आजूबाजूला राहणार्‍या लोकांचा आर्थिक स्टार वाढला होता. पर्यटनासाठी आलेले पर्यटक बटाटा वडा पासून मक्याचे कणीसपासून तांदळाच्या भाकर्‍या घरगुती जेवण शीतपेय यासारख्या वस्तूंची जोरदार विक्री व्हायची आणि त्यातून स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह चालायचा.

मात्र प्रशासनाने मागील काही वर्षे अपघाताचे कारण पुढे करून कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठे यांच्या ठिकाणी येणार्‍या पर्यटकावर बंदी घातली आणि त्या त्या ठिकाणी येणार्‍या पर्यटकानावर करावी करण्याचे जाहीर केले. कलम 144 लावून जमाव बंदी करणार्‍यावर कारवाई होणार या भीतीने कर्जत तालुक्याचे पावसाळी पर्यटन मोडून काढण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. रायगड किंवा शेजारच्या ठाणे जिल्ह्यात सर्व पर्यटन स्थळावर पावसाळ्यात बंदी आहे तरी देखील तेथील पर्यटन जोरात सुरु आहे. कर्जत तालुक्यात 10 जून पासून आतापर्यंत कोणालाही फिरकू दिले जात नाही,त्यामुळे अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सोलनपाडा येथील निसर्ग अनेकांना इच्छा असून पाहता येत नाही.त्याचा परिणाम कर्जत तालुक्यातील हि जमावबंदी आणि कारवाईची भीती यामुळे पर्यटक येणे कमी झाले आहे आणि  आले तर सरळ माथेरान गाठतात.त्यामुळे स्थानिक लहान लहान धबधबे आणि मोठे प्रसिद्ध धबधबे देखील ओस पडले आहेत. त्यावेळी जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत.

कर्जत तालुक्यात प्रशासनाने असे निर्बंध लावताना स्थानिक प्रत्येक धबधबा आणि पाणवठे याठिकाणी जाऊन तेथील स्थानिक आणि व्यावसायिक यांच्यासोबत बोलून जमावबंदीचा निर्णय घ्यायला हवा होता अशी सरळसरळ मागणी महहराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. तर व्यवसायिक सागर शेळके यांनी प्रशासनाने आपल्या निर्णयाचा विचार करावा आणि पर्यटन सुरु ठेवावे अशी मागणी करणारे निवेदन रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केले. मात्र आता हि जमावबंदी कर्जत तालुक्यासाठी शाप ठरत आहे. श्रावण महिना सुरु होईपर्यंत पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. परंतु जमावबंदी कायम असल्याने व्यवसायीक यांनी देखील यापूर्वी झालेले नुकसान आणखी होऊ नये यासाठी कोणतीही रिस्क घेतली नाही. मात्र प्रशासनाच्या या एकमार्गी भूमिकेमुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन लयाला जाण्याची भीती आहे. निसर्गाने भरभरून दिलेलंय कर्जत तालुक्याला वरदान लाभले आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यास बंद आहे अशी स्थिती कर्जत तालुक्यातील निसर्ग पर्यटनाची झाली आहे.

प्रशासनाची बंदी अशी आहे….

गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी व त्यांच्या 1 कि.मी. परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे, दर्‍यांचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणार्‍या ठिकाणी फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणार्‍या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली करणे,  सायंकाळी 6.00 वाजल्यानंतर ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत या कालावधीत धबधबे किंवा तलाव या ठिकाणी पाण्यात उतरणे, वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतूकीस परिणाम, अडथळा होईल, अशा प्रकारे वाहन चालविणे, वाहनाची ने-आण करण्यावर ही बंदी असेल.

सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॉस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लॉस्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, टिंगळटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टीम वाजविणे, गाडीमधील स्पीकर, वूफर वाजविणे  व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे, अत्यावश्यक सेवा वगळून धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश, करोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असून सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करणे या सर्व बाबींसाठी दि.10 जून ते दि.09 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी कर्जत प्रांताधिकारी अजित नैराळे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply