Breaking News

‘प्रायमा’तर्फे रसायनीत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

मोहोपाडा : प्रतिनिधी

पाताळगंगा रसायनी डॉक्टर असोसिएशन (प्रायमा)यांच्या वतीने रसायनी गुळसूंदे तुंगारतन विद्यालयातील 250 हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रायमाच्या सर्व डॉक्टरांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य सेवा देण्यात सहभाग नोंदवला.प्रायमाच्या अध्यक्षा डॉ. लेखा उचील ह्यांनी ह्या आणि अशा स्वरूपाचे विविध कार्यक्रम येणार्‍या काही सप्ताहामध्ये होणार असल्याचे सांगितले. तसेच तुंगारतन विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी हातभार लावला. तुंगारतन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुतार आणि संस्थेचे अध्यक्ष पाटील प्रायमाच्या डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply