Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून पनवेलमधील लोणिवलीत साकारली अंगणवाडी

ग्रामस्थांनी मानले आभार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून व जिल्हा वार्षिक योजना निधीतून पनवेल तालुक्यातील लोणिवली येथे नवीन अंगणवाडी उभारण्यात आली असून या अंगणवाडीचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 29) करण्यात आले. लोणिवली येथील अंगणवाडी जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने याकडे लक्ष देत त्यांच्या जिल्हा वार्षिक योजना निधीतून आठ लाख 50 हजार रुपये खर्च करून नवीन अंगणवाडी बांधण्यात आली आहे. यामध्ये वर्ग, किचन, स्टोअर रूम, शौचालय अशा सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अंगणवाडीत चिमुकले विद्यार्थी शिकत असतात आणि त्यांच्यावर शैक्षणिक संस्कार घडविण्याची ती पहिली पायरी असते. आमदार प्रशांत ठाकूर आणि विद्यार्थी यांचे अतूट नाते आहे. त्या अनुषंगाने त्यांचे लक्ष विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कायम असते. या अंगणवाडीच्या उभारणीमुळे ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानत त्यांना या वेळी धन्यवाद दिले. अंगणवाडी उद्घाटन कार्यक्रमास माजी जि. प. सदस्य संजय पाटील, सरपंच सुरेखा पवार, उपसरपंच सुवर्णा पवार, माजी सरपंच गुरूनाथ भोईर, संतोष शेळके, सुधीर पाटील, आत्माराम मालुसरे, बबन मालुसरे, मनोज भालेकर, पोलीस पाटील सुभाष पाटील, माजी उपसरपंच संपदा पालव, सदस्य लीलाबाई कातकरी, कांता भालेकर, दर्शना पाटील, बाळाराम पाटील, विभागीय अध्यक्ष सतीश मालुसरे, नाना पाटील, अतिश मालुसरे, रोशन मालुसरे, काशिनाथ अरिवले, संतोष पवार, संदीप उतेकर, मनोहर पवार, मयूर धनावडे, अंगणवाडीसेविका निकीता पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply