नागरी समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका क्षेत्रातील करवले, ओवे पेठ तसेच पनवेल शहरातील मस्जिद परिसरात माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी नागरी समस्यांचा आढावा घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंगळवारी केलेल्या पाहणी दौर्यावेळी करवले येथे रस्ते, गणपती विर्सजन घाट, अंगणवाडी; ओवे येथे रस्ते, पथदिवे; पेठ गावात रस्ते, हायमास्ट, मलनिस्सारण वाहिन्या, पाण्याच्या लाईन यांसारख्या समस्यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे पनवेल शहरातील दाऊदी बोरा जमात सिमेंट्री कब्रस्थान ट्रस्टच्या मस्जिद परिसरातील साफसफाई आणि गटारांवरील तुटलेल्या झाकणांची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी करवले येथे पाणीपुरठा विभागाचे अभियंता श्री. चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. या पाहणी वेळी माजी नगरसेवक हरेश केणी, भाजप युवा मोर्चाचे विनोद घरत, श्री. म्हात्रे, भाजप नेते प्रभाकर जोशी, सचिन वास्कर, इर्शाद शेख, जयदास तेलवणे, विशाल जोशी, संदीप वास्कर, दशरथ जोशी, अल्पसंख्याक मोर्चाचे मन्सूर पटेल, साजीद पटेल, रमझान शेख, एजाज पटेल, माणिक म्हात्रे, निर्दोष केणी, गोपीनाथ पाटील, वासुदेव माळी, संतोष पाटील, संतोष मढवी, लालचंद मढवी, योगेश पाटील, जितेश म्हात्रे, अभियंता संजय कटेकर उपस्थित होते. मस्जिद परिसर पाहणी वेळी सचिव एम. अलियासगर गोलवाला, इद्रीस शायर, एम. जोहर वोहरा, एम. मुर्तझा वोहरा, मोहम्मद वोहरा, अलीअकबर सारीवाला आदी उपस्थित होते.