Breaking News

कळंबोलीतील उद्यानांची दुरवस्था

पे अ‍ॅण्ड पार्क बनले मद्यपी व जुगारांचा अड्डा

पनवेल : वार्ताहर

कळंबोली सेक्टर 2 व सेक्टर 6 मधील उद्याने डंपिंग ग्राउंड बनली आहेत. गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलला गेला नसल्याने नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तेव्हा तो कचरा ताबडतोब उचलण्यात यावा व मद्यपीची बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कळंबोली सेक्टर 2 मधील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले पे अ‍ॅण्ड पार्क उद्यान एक वेळ कळंबोली शान वाढवत होते. त्याच्या संरक्षण भिंती गायब आहेत. ते आज लोप पावत आहे.

तर साईनगर वसाहतीजवळ सिडकोचे उदयान असून हे शहरातील महत्त्वाचे उद्यान आहे. उद्यान गर्दुल, मद्यपी, जुगारी आणि भिकारीचे ठिकाण बनले आहे. सेक्टर 6 मधील उद्यानाना काही महिन्यांपूर्वी संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या पण ते काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या जाळ्या तुटुन गेल्या आहेत. त्यामुळे उद्यान लोप पावत चालले आहे. या संपूर्ण उद्यानात गटुळे व मद्यपींचा दररोज अड्डा जमतो त्यामुळे या ठिकाणी मद्याच्या बाटल्या इतस्ततः विखुरलेल्या दिसून येतात. परिणामी हे उद्यान महिला वर्गाला व ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित बनले आहे.

सेक्टर 2 मध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीवर कार्यरत असलेल्या कामगारांसाठी सोयी सुविधा देताना सिडकोने शौचालय उभारण्यात आले आहे. त्याची निगा राखली जात नसल्याने त्यात किडे पडले आहेत येथे.

कायमच दुर्गंधी असते, त्यामुळे कामगारांना नाईलाजास्तव त्याचा वापर करावा लागतो. पण त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply