Breaking News

आयडीबीआयमधील ठेवी सुरक्षित ; अफवांवर विश्वास ठेवू नका -अजयसिंह ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जुने पनवेल येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत बँकेचा 56वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. स्थापना दिवसाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबिरासाठी युनिकेअर हेल्थ सेंटरचे सहकार्य लाभले. आयडीबीआय बँकेतील ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत. भारत सरकारने नुकतीची नऊ हजार 300 कोटींची ठेव आयडीबीआय बँकेत ठेवली आहे. कुणीही ही बँक बंद होईल, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, आपल्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित आहेत, अशी ग्वाही या वेळी पनवेल शाखेचे प्रबंधक अजयसिंह ठाकूर यांनी दिली. ग्राहकांसाठी आयोजित आरोग्य शिबिरात शंभरहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली. नाडी परीक्षण, मधुमेह, रक्तदाब, आहार सल्ला, बीएमआय व बॉडी फॅट, अल्पदरात रक्त तपासणी या शिबिरात करण्यात आली.

या वेळी क्षेत्रिय प्रबंधक अखिलेशकुमार मिश्रा, नवीन पनवेल शाखेचे शाखा प्रबंधक मनीष पाठक, सर्व कर्मचारी उपस्थित होते. ग्राहकांनीही बँकेला स्थापना दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व बँकेवरील विश्वास दाखवून दिला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply