पनवेल : प्रतिनिधी
पनवेल बस आगारातून एसटी महामंडळाच्या पनवेल ते कोनमार्गे सावळे-आपटा-जांभिवली सर्व बससेवा पूर्ववत करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी पनवेल आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.
या संदर्भात आमदार महेश बालदी यांनी व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, माझ्या विधानसभा मतदारसंघातील सावळे, गुळसुंदे, आपटा, जांभिवली या ग्रामपंचायती ग्रामीण भागांतील असून या भागांतील ग्रामस्थांना पनवेल पनवेल येथे खरेदीसाठी, शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी तसेच इतर कामांसाठी वारंवार जावे लागते. या भागात औद्योगिक कारखानेही मोठ्या प्रमाणावर आहेत. कोरोना काळापूर्वी या भागांत एसटी बसेसची सुविधा उपलब्ध होती, मात्र या सेवा बंद झाल्यामुळे, ग्रामस्थांना कामगारांना खाजगी वाहनाने रिक्षाने प्रवास करावा लागत आहे, तसेच सद्या शाळा, कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचीही प्रवासाच्या दृष्टिकोनातून गैरसोय होत आहे.
या ग्रामीण परंतु औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भागातील ग्रामस्थ तसेच कामगार यांचे पनवेल शहरी भागाशी दळणवळण सुरू होण्यासाठी, त्यांची उपजीविका पूर्ववत होण्यासाठी तसेच ग्रामस्थांना व कामगारांना सोसावी लागणारी आर्थिक झळ दूर करण्यासाठी पनवेल कोन मार्गावरील सर्व एसटी बससेवा सुरू करण्यात यावी, असे या निवेदनात म्हंटले आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …