पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील मालडूंगे, धोदाणी, गाढेश्वर परिसरात मंगळवारी (दि. 9) जागतिक आदिवासी दिनानिमित्त मालडूंगे येथील हुतात्मा नाग्या महादू कातकरी चौक (आदिवासी क्रांतिकारक स्तंभ) येथे क्रांतीकारकांना मानवंदना करण्यात आले. गाढेश्वर येथील ठाकूर समाजाचे क्रांतीकारक पद्या ठाकूर यांनीदेखील मानवंदना करून तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने मालडूंगे, धामणी, देहरंग, बापदेववाडी, धोदाणी व गाढेश्वर परिसरात बाईक रॅली काढण्यात आली. बाईक रॅलीनंतर धोदाणी येथे कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून समाजातील बांधवांना जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व पटवून दिले, तसेच गायिका उषा वारगडा यांनी प्रबोधनपर गीत गायले. मालडूंगे ग्रामपंचायतीचे सहकार्य असल्याने सरपंच हर्षदा चौधरी यांच्यासह ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते पोलीस पदू दोरे, काळूराम वाघ, सी.के. वाक, सोमनाथ चौधरी, गणपत वारगडा, सिताराम चौधरी, धर्मा वाघ, महादू जाधव, राम भस्मा, चंद्रकांत सांबरी, संजय चौधरी, जनार्दन निरगुडा, पद्माकर चौधरी, सुनिल वारगडा, नारायण चौधरी, सिताराम वारगडा, रमेश भस्मा, आर. डी. वाक, जर्नादन घुटे, गौरव दरवडा, रवी पाटील, किरण ढुमणा, विलास भस्मा, अर्जुन घुटे, शाम चौधरी, राजाराम चौधरी आदी उपस्थित होते.