Breaking News

जिल्हास्तरीय कृषी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व यू.पी.एल. यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय कृषी मेळावा श्री समर्थ कृपा वृद्ध धाम परहुर येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोरोना काळात गेल्या वर्षी शेतमालाची विक्री व्यवस्था सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने मोलाची मदत केली होती, परंतु या वर्षी राज्य सरकारने फारसे निर्बंध घातले नसल्यामुळे शेतकर्‍यांना आपला शेतमाल विकण्यास मदत मिळाली. त्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन विक्री करण्यात आली. अलिबाग, मुरूड येथील शेतकरी नावीन्यपूर्ण शेती करताना दिसत आहेत.

शेतकर्‍यांना पीक फवारणीचे प्रात्यक्षिक व औषधांच्या मात्रा समजावून देण्यासाठी कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी या वेळी तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले. नैसर्गिक आपत्तीत देखील टिकून राहता यावे अशी पीक पद्धती अंगीकारावी, असे मेळाव्यात सांगण्यात आले. तसेच शेतात येणार्‍या शेतमालाची शहरी भागातील बाजारात विक्री करण्यासाठी लागणारी विक्रीसाखळी व्यवस्था उभारणेबाबत मोलाचे मार्गदर्शन कृषी अधिकार्‍यांनी केले. या वेळी शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांवरील रोगांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी अधिकार्‍यांशी चर्चा केली.

या कृषी मेळाव्यात कृषी अधिकार्‍यांकडून रायगड जिल्ह्यातील प्रयोगशिल शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे असोसिएट डीन डॉ. यू. व्ही. महाडकर, रायगडचे उपविभागिय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, कृषी कमिटी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य आदी या शेतकरी मेळाव्यास उपस्थित होते.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply