Breaking News

संत निरंकारी मिशनतर्फे ग्रामस्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर, बातमीदार

तालुक्यातील पिरकोन गाव येथे रविवारी (दि. 3) सेक्टर 19 विंधणे, झोन मुंबई 39च्या संत निरंकारी मिशनच्या सदस्यांनी पिरकोन गावात स्वच्छता अभियान राबविले. संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार या अभियानात संत निरंकारी मिशनमधील ज्येष्ठ नागरिकांसह महिला, तरुण सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. संत निरंकारी मिशनच्या वतीने संयोजक दत्ताराम पाटील, क्षेत्रीय संचालक अशोक केरेकर, सेवादल इंचार्ज समाधान गावंड, संजय गायकवाड, प्रकाश म्हात्रे, मिलिंद म्हात्रे, रवींद्र मढवी, सचिन पाटील, अनंत शेनॉय, सुरेश कोळी, रूपेश ठाकूर, रुपाली कोळी उपस्थित होते. या स्वच्छता अभियानात प्राथमिक व माध्यमिक शाळा परिसर, तलाव, रस्ते इत्यादींची साफसफाई करण्यात आली. संत निरंकारी मिशनच्या वतीने राबनिण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला. उपस्थित सर्व सदस्यांसाठी शेवटी स्नेहभोजन (लंगर)चे आयोजन संत निरंकारी सत्संग पिरकोनच्या वतीने करण्यात आले होते.

Check Also

नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …

Leave a Reply