एमएनएम स्कूल व टीएनजी कॉलेजमध्ये अटल टिकरींग लॅब
पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी नेहमीच विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. त्या अंतर्गत संस्थेच्या गव्हाण विभागातील मोरु नारायण म्हात्रे विद्यालय (एमएनएम) व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेमध्ये (टीएनजी) अटल टिकरींग लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) झाले.
या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, रघुनाथ देशमुख, सुधीर ठाकूर, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना डोईफोडे, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रणिता गोले, पर्यवेक्षक अरुण जोशी, पंचायत समितीचे अधिकारी अभिजीत मटकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवीन आधुनिक जग घडत असताना अटल टिकरिंगची धारणा महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन करीत येत्या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांनी हर घर तिरंगा अभियानात उस्त्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश औद्योगिक आणि आर्थिक दृष्टीने मजबूत बनत आहे, असे मत व्यक्त केले.