पनवेल : रामप्रहर वृत्त
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे येथील विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित नमो चषक 2025 क्रीडा महोत्सव अंतर्गत 9 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता कामोठे सेक्टर 6 येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघास 20 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 10 हजार रुपये, तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सहा अधिक तीन असा खेळाडूंचा गेम फॉरमॅट असून पाच मुले, एक मुलगी आणि तीन सब्स्टीट्युट असा नऊ खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघात एक मुलगी खेळाडू असणे अनिवार्य आहे.
युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा म्हणजे केवळ फुटबॉल खेळण्याची संधी नसून पनवेलच्या क्रीडा संस्कृतीला एक नवीन दिशा देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आणि नागरिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Check Also
भाजप सदस्य नोंदणी मोहिमेला गती द्या -प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण
पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक पनवेल …