Breaking News

आमदार प्रविण दरेकर यांची सदिच्छा भेट

शिरढोण येथे स्वराज्यभूमी कोकणयात्रा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीने स्वराज्यभूमी कोकणयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेंतर्गत 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व महानायकांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कृतज्ञता व्यक्त करणे आणि जनजागृती करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या गावी विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 12) भेट देऊन अभिवादन केले.

कोकण ही देशाची स्वराज्य भूमी आहे. म्हणूनच अनेक राष्ट्रपुरुष या भूमीतून निर्माण झाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍या महानायकांमध्ये कोकणची भूमी कायम अग्रणी राहिली. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समृद्ध कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीने हा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत यावा, याकरिता स्वराज्य भूमी कोकण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या वेळी ग्लोबल कोकण समृद्ध कोकण प्रदेश संघटेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सरपंच साधना कातकरी, प्रितेश मुकादम, उपसरपंच रेश्मा वाजेकर, माजी उपसरपंच प्रमोद कर्णेकर, विजय भोपी, मोनाली घरत, निकीता चौधरी, संगीता चौधरी, सनीका कातकरी, भाऊ वाजेकर, गजानन घरत, मंधार जोग, मयुर टकले, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply