Breaking News

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊतांमध्ये वाद

मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ऊर्जामंत्री नितीन राऊत असे चित्र निर्माण झाले आहे. मंत्रिपद मिळावे यासाठी पटोले प्रयत्नशील असून, त्यांना राऊत याचे ऊर्जा खाते हवे आहे, तर राऊत यांच्या मंत्रिपदावर पटोले यांचे लक्ष
असल्याने गेले दोन दिवस राऊत दिल्लीत ठाण मांडून बसले होते.
नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. नंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. आता पटोले याना मंत्रिपदाचीदेखील अपेक्षा आहे, असे सांगितले जातेय. त्यातही ऊर्जा विभागाकडे त्यांचे लक्ष असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. ऊर्जा विभागाबाबत नाना पटोले यांनीही अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले होते. त्यामुळे आता नितीन राऊत नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
राऊत यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठीकडे काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी तक्रार केल्याची चर्चा होती. त्या वेळी राऊत यांना दिल्लीवारी करावी लागली. आपल्या विरोधात प्रदेशाध्यक्षांच्या गटातून वातावरण तापवले जात असल्याची चर्चा राऊत गटात सुरू आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply