पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाच्या अमृत महोत्सवी (75व्या) स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इलिट यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 15) तिरंगा एकता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनी सकाळी 9.30 वाजता तिरंगा रॅली पनवेल तालुका व शहर भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून सुरू होणार असून ही सायकल रॅली पाच किमी अंतराची आहे. या वेळी देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. या रॅलीत सहभागी होणार्या सायकलस्वारास मोफत टी-शर्ट देण्यात येणार आहे.
या रॅलीत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा तसेच अधिक माहिती व सहभागासाठी रोहित जगताप (8691930709), आदित्य जोशी (9022044025) किंवा देवांशू प्रभाळे (8433513540) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …