रेवदंडा : प्रतिनिधी
स्वच्छ सागर, सुरक्षीत सागर उपक्रम अंतर्गत साळाव येथील जेएसडब्ल्यू आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या सयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 17) रेवदंडा समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
रेवदंडा पारनाका येथून समुद्र किनारी स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. मेरीटाईम बोर्डचे रेवदंडा बंदर पोर्ट इन्स्पेक्टर सतिश देशमुख, पोर्ट इस्पेक्टर कुबारू, राहूल धायगडे, राम कैवारी, जेएसडब्ल्यू कंपनीचे मॅनेजर भानुप्रसाद, सीएसआर विभाग प्रमुख राम मोहिते, एम. जी. पाटील, कृष्णा धुमाळ, संतोष नांदगावकर, रसिका काळे, राकेश चवरकर, प्रिया वर्तक, तसेच राजेंद्र बैकर, राजेश तांबडे, राजेंद्र किचड, प्रितिज हाले, रत्नाकर घाग, आज्ञेश पाटील, सतिश कांनुगो यांच्यासह विद्यार्थी व नागरिक या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.