Breaking News

खोपोलीत आढळला डेंग्यू सदृश्य रुग्ण

खोपोली : प्रतिनिधी

येथील बाजारपेठेत मोबाईल कव्हरची विक्री करणार्‍या अरविंद कुमार याला डेंग्यू सदृश्य रोगाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या वृत्ताने खोपोली शहरात खळबळ उडाली आहे.

अरविंद कुमार हा मूळचा कल्याणचा रहिवासी असून तो सध्या खोपोलीत राहत आह. बाजारपेठेतील सार्वजनिक मुतारीच्या भिंतीजवळ तो मोबाईल कव्हर्स व इतर वस्तूंची विक्री करतो. खोपोली शहरात सध्या सर्दी, खोकल्याची मोठ्या प्रमाणात साथ असून खाजगी तसेच सरकारी दवाखान्यात याबाबतचे रुग्ण आढळून येत आहेत. अरविंद कुमार एका खाजगी दवाखान्यात तपासण्यासाठी गेला असता त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्याच्या रक्ताचा नमुना शासकीय दवाखान्यात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याला डेंग्यू झाला असे अधिकृत सांगता येत नाही. रक्त तपासणीचा अहवाल  आल्यानंतरच अधिकृत निदान सांगता येईल, असे रुग्णालयातून सांगण्यात आले.

दरम्यान, या ठिकाणी मोबाईल कवर इतर विक्रीसाठी अरविंद कुमार बसतो त्याच्या शेजारीच बाजारपेठेतील सार्वजनिक मुतारी आहे. संपूर्ण बाजारपेठेत एकमेव असणार्‍या या सार्वजनिक मुतारीचा वापर दररोज हजारो नागरिक करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच अस्वच्छता व दुर्गंधीचा नेहमी त्रास होत असल्याचे परिसरातील व्यापार्‍यांचा आरोप आहे. केव्हा तरी तक्रार केल्यानंतर नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला जाग येते व त्यावेळेस मुतारीची स्वच्छता केली जाते.  नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने या ठिकाणी तात्काळ व नियमीत औषध फवारणी करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

दरम्यान, मागील महिन्यात अतिमुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाण्याची डबकी तयार झाली आहेत. तसेच परिसरात रानटी गवत वाढल्यामुळे ही मच्छर व डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. खोपोली नगर परिषदेने शहरामध्ये तात्काळ औषध फवारणी करावी, अशी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply