अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होऊ लागलाय. पावसाची हळूहळू परतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. गुरुवारी (दि. 18) सकाळी संपलेल्या 24 तासात सरासरी 20.02 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा 1 जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत सरासरी दोन हजार 504.81 मिमी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक पर्जन्यमानाच्या 80.76 टक्के पाऊस पडल आहे. पावसाचा अजून एक महिना बाकी आहे. त्यामुळे यंदा 100 टक्के पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात पावसाला काहीशी उशिरा सुरुवात झाली. सरासरी 643.20 मिमी पाऊस पडतो. यंदा जून महिन्यात 357.22 मिमी पाऊस पडला. मात्र जुलै महिन्याच्या मध्यात पावसाचे जोरदार आगमन झाले.
जून महिन्याची तुट पावसाने जुलै महिन्यात भरून काढली. जुलै महिन्यातील पावसाची सरासरी 1159.27 मिमी आहे. मात्र यंदा जुलै महिन्यात 1460.25 मिमी पाऊस पडला. जुलै महिन्याच्या सरासरीच्या 125.96 टक्के पाऊस पडला. ऑगस्ट महिन्याची सरासरी 874.50 मिमी आहे. 18 ऑगस्टपर्यंत 687.34 मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या 78.60 टक्के पाऊस पडला आहे.
रायगड जिल्ह्यात मागील वर्षी 18 ऑगस्ट अखेरपर्यंत एकूण सरासरी दोन हजार 778.86 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली होती. यंदा 18 ऑगस्टपर्यंत सरासरी दोन हजार 504.81 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. पावसाचा अजून एक महिना बाकी आहे. त्यामुळे यंदा 100 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
माथेरानमध्ये पावसाने ऑगस्ट महिन्यातच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. 18 ऑगस्टपर्यंत माथेरानमध्ये सरासरीच्या 139.11 टक्के पाऊस पडला आहे.
पावसाची तालुका निहाय टक्केवारी
अलिबाग- 78.80 टक्के, पेण 82.21, मुरुड 74.37, पनवेल 79.97, उरण 78.52, कर्जत 81.88, खालापूर 79.26, माणगाव 67.14 82.94, सुधागड 68.86, तळा 83.50, महाड 71.20, पोलादपूर 72.62, म्हसळा 71.91, श्रीवर्धन 85.91, माथेरान 139.11. एकूण : 1298.18. सरासरी : 80. 76 टक्के.