Breaking News

मुरूडमध्ये वाहतूक सुरळीत होण्यासाठी सम-विषम पार्किंग

मुरूड : प्रतिनिधी

दोन दिवसांनी गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून, या कालावधीत शहरातील बाजारपेठेत गर्दी, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुरूडमध्ये वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे, पोलीस निरीक्षक नितिन गवारे, व्यापारी बँकेचे चेअरमन संदिप पाटील, नगर परिषद कार्यालयीन अधिकारी परेश कुंभार, प्रशांत दिवेकर, राकेश पाटील, सतेज निमकर, सतिष जंजिरकर, सुदेश माळी, पोलीस नाईक सागर रसाळ, नंदकिशोर आंबेतकर, संजय वेटकोळी, रुपेश पाटील, बाबु सुर्वे, राशीद फहीम, माजी शिक्षक दामाद  आदींसह नागरिक व व्यापारी उपस्थित होते. गणेशोत्सव काळात खरेदीकरिता नागरिकांची गर्दी होत असल्याने  बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असते. यावरील उपाययोजनेबाबत प्रशासक पंकज भुसे यांनी व्यापारी, पोलीस प्रशासन यांच्या बरोबर बैठक घेऊन बाजारपेठेत वाहतूक कोंडीबाबत चर्चा करून त्या संदर्भात नियमावली करण्यात आली. वाहन चालकांनी या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पंकज भुसे यांनी या वेळी मुरूड बाजारपेठेत केले. या वेळी मुरूड बाजार पेठेत सम, विषम तारखेचे फलक लावण्यात आले. त्याबरोबर एक दिक्षा मार्गचा वापर करावा, नगर परिषद कार्यालयासमोरील सिध्दीबाग व कुलाबा बाजार येथे वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पार्किंग करून सहकार्य करावे व वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांनी या वेळी केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply