Breaking News

मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणार्‍यास महाडमधून अटक

महाड : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या एकाला महाड येथून अटक करण्यात आली आहे. प्रशांत पाटील असे आरोपीचे नाव असून तो मूळचा कोल्हापूरचा आहे.
कोल्हापूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या महाड नवेनगर येथे वास्तव्यास असलेल्या प्रशांत पाटील याने रविवारी रात्री दारूच्या नशेत मंत्री छगन भुजबळ यांच्या पुणे येथील कार्यालयात फोन करून ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये मला भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे, असे आरोपी प्रशांत पाटील याने म्हटले आहे तसेच आपण सांगून काम करतो, असेदेखील त्याने फोनवर सांगितले.
दरम्यान, आरोपीने केलेल्या फोनचे लास्ट लोकेशन महाड येथे दिसले. प्रशांत पाटील हे नाव समजताच मध्यरात्री पोलीस महाडमधील मद्य व्यापारी प्रशांत पाटील यांच्या घरी पोहचले, मात्र हा प्रशांत पाटील तो नाही हे समजले. त्यानंतर आरोपी प्रशांत पाटील याला महाड नवेनगर येथून मंगळवारी पहाटे 4च्या सुमारास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, हवालदार कराडे, शिपाई ओमले, पिंगळे, शिपाई तांदळे यांनी ही कारवाई केली. आरोपी प्रशांत पाटीलला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पुणे पोलीस करीत आहेत.

Check Also

रायगड क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार -आशिष शेलार

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)ला सर्वतोपरी मदत करणार, असे आश्वासन भारतीय क्रिकेट …

Leave a Reply