Breaking News

‘मतदारसंघाचा विकास हाच ध्यास’

उरण : रामप्रहर वृत्त

उरण मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता. उरण मतदारसंघाचा विकास करणे हा एकमेव ध्यास असल्याचा विश्वास उरण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. उरण विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी करून निवडून आलो आहे. यावरून मतदारांनी विकासाला आपले अमूल्य मत दिले आहे. मतदारसंघातील मतदारांना आपला विकास महेश बालदीच करू शकतील, असा विश्वास त्यांना आहे. त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता उरण मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच आपण प्रयत्न करणार असल्याचे विजयानंतर पुढील रणनीती काय असणार यावर बोलताना आमदार महेश बालदी यांनी पत्रकारांना सांगितले. उरण मतदारसंघात अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी या मतदारसंघाचे नेतृत्व करणार्‍यांना अपयश आले. त्यामुळे मतदारसंघात नाराजीचा सूर निघत होता. मतदारांना विकास करणारे नेतृत्व हवे होते. त्यामुळे मतदारांनी मला आमदार म्हणून दणदणीत मतांनी निवडून देत माझ्यावर विश्वास दाखविला, असे शेवटी महेश बालदी म्हणाले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply