Breaking News

युवा महोत्सवात डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयाचे यश

रोहे : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठ अंतर्गत या वर्षीचा युवक महोत्सव 26 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील जेएसएम कॉलेज येथे घेण्यात आला. या महोत्सवातील विविश स्पर्धांमध्ये रोहा तालुक्यातील कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले.  युवक महोत्सवामधील वादविवाद स्पर्धेमध्ये डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयाच्या प्रतीक येलकर व रोहन पाटील यांनी उत्तेजनार्थ सन्मान मिळविला. मोनो अ‍ॅक्टींग स्पर्धेमध्ये रोहन पाटील व त्याच्या सहकार्‍यांनी तिसरा क्रमांक मिळाला. यशाबद्दल संस्थेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, प्रा. प्रतीक्षा सिंह, प्रा. सतीश सावळे,  प्रा. नेहल प्रधान, प्रा. रेश्मा शेळके, प्रा. सूर्यकांत आमलपुरे, प्रा. दर्शना माळी, प्रा. अनिरुद्ध मोरे, प्रा. जयवंती अडलीकर, प्रा. राधाकृष्णन कीर्ती, प्रा. अश्विनी पवार, प्रा. प्रतीक्षा पडवळ, प्रा. करुणा बडे, प्रा. अनिरुद्ध मोरे, आदींनी यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply