महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकारी याचा बुधवारी (दि. 31) दारूचे अतिसेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना महाडमध्ये घडली आहे.
महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणून कार्यरत होते. त्यांना नेहमी अति प्रमाणात दारू पिण्याची सवय होती. बुधवारी जास्त प्रमाणात दारू सेवन केल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दुपारी उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दारूबंदी अधिकार्याचा दारू पिऊन मृत्यू झाल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कापडेकर करीत आहेत.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …