Breaking News

युईएस कॉलेजमध्ये तरंग फेस्टिवल उत्साहात

उरण ः वार्ताहर

युईएस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये तरंग फेस्टिवल उत्साहात साजरा झाला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. जसे डुडल मेकिंग, नेल आर्टस्, क्विझ, स्पॉट फोटोग्राफी, टॅटू, नॉन फ्राय कुकिंग, डिबेट, ट्रेझर हण्ट इत्यादी रंगीबेरंगी खेळांची व स्पर्धांची रेलचेल होती.

या वर्षीही विद्यार्थ्यांसाठी उद्योजक मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वस्तूची विक्री करून कुशल उद्योजक होण्याचे धडे घेतले. ’तरंग’ फेस्टिवलच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि. 25) रोजी सरस्वती मंडपात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम आनंदात पार पडला.

युईएस. संस्थेचे ट्रस्टी मेंबर्स, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, सिनिअर कॉलेजचे एचओडी तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक विभागातील सुपरवायझर्स यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये भाग घेतला, तर काही मुलामुलींनी रॅम्प वॉक करुन उपस्थितांची मने जिंकली. वर्षभर आयोजित केलेल्या कॉलेजमधील विविध स्पर्धांमध्ये तसेच तरंग फेस्टिवलमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply