Breaking News

रायगडातील रेशन दुकानांना मिळणार आयएसओ मानांकन

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांना आयएसओ मानांकन देण्याची योजना जिल्हा पुरवठा विभागाकडून राबविण्यात येणार आहे. रेशनधारकांना चांगली सुविधा मिळावी यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. रेशन दुकानांची तपासणी करून दुकानचालकांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्याच्या 15 तालुक्यांतील प्रत्येकी 10 दुकानांचा या योजनेत समावेश आहे. यामुळे रेशन दुकानातील अस्वच्छता, नेट कनेक्टीव्हीटीचा अभाव, रेशनधारकांना दिली जाणारी वाईट वागणूक, धान्य मोजताना होणारी हातचलाखी कमी होईल. वेळेवर धान्य वितरण होईल. आकर्षक मांडणी असेल. कोणत्या योजनेंतर्गत किती धान्य प्राप्त झाले याची माहिती फलकावर असेल. वजन-काटे प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावले जाईल, त्याबाबत शंका असल्यास कोठे तक्रार करायची याबाबतचे क्रमांक व पत्त्याचाही बोर्ड दुकानाबाहेर लावला जाईल. दुकानदार तसेच दुकानाबाबत काही तक्रारी असल्यास त्याबाबतही कोठे तक्रार करावी याची माहिती देणारे बोर्ड लावणे बंधनकारक राहणार आहे. दुकानातील उपलब्ध धान्याची आवक-जावक, उपलब्ध साठा याचीही माहिती या बोर्डवर लिहिण्यात येणार आहे.
ग्राहकांना या सर्व सुविधा उपलब्ध करून देणार्‍या रेशन दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त होणार आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रेशन दुकानचालकांनी तयारीही सुरू केली आहे.

जास्त उत्पन्न गटातील चार हजार 500 ग्राहकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना रास्त धान्य वितरण व्यवस्थेतून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. गरजवंताना धान्य वितरणाची सुविधा देताना रेशन दुकानांचा लूक बदलण्याचा प्रयत्न आहे. आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांची माहिती दुकानदारांना दिली जात आहे.
-मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी

  • दुकानांची एकूण संख्या : एक हजार 365
  • रेशन कार्डधारकांची संख्या : सात लाख 12 हजार
  • दारिद्य्ररेषेखालील : 99 हजार 041
  • दारिद्य्ररेषेखालील : पाच लाख 33 हजार 832
  • नियत्वय होणारे धान्य (मे. टन) : 36 हजार 625

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply