Breaking News

रक्तदान शिबिराला रोहेकरांचा प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

धाटाव : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका भाजपच्या वतीने भाटे वाचनालयात मंगळवारी (दि. 20) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रोहेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या शिबिरास भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजप तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, महेश ठाकूर, सनल कुमार, आप्पा देशमुख, शैलेश रावकर, शहराध्यक्ष यज्ञेश भांड, उपाध्यक्ष राकेश गुंदेशहा, सोशल मीडिया संयोजक सुनील इंगवले, धाटाव विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, कामगार आघाडी तालुका अध्यक्ष विलास डाके, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर, प्रधानमंत्री आवास योजना जिल्हा प्रमुख हाजी कोठारी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश डाके, जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, तालुका उपाध्यक्ष निलेश ठिकोणकर, शहर अध्यक्ष निलेश धुमाळ, विद्यार्थी आघाडी प्रमुख वैभव कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रद्धा घाग, तालुका अध्यक्ष जयश्री भांड, शहर अध्यक्ष ज्योती सोनल कुमार, चिटणीस विप्रा फाटक, तालुका सरचिटणीस अर्चना वाघमारे, उपसरपंच वेदिका डाके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी 121 जणांनी रक्तदान केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्यांनी खर्‍या अर्थाने कष्टातून व दूरदृष्टीने आपल्या राष्ट्राचा मान-सन्मान जगात उंचाविण्याचा प्रयत्न केला असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. या कालावधीत रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छतेचे कार्यक्रम असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत, तर या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे आज या राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री बनले आहेत. त्यांचाही वाढदिवस असल्याने आमच्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करीत असताना आज दक्षिण रायगड जिल्ह्यात महाड, पोलादपूर, रोहा, नागोठणे, रेवदंडा चौल, मुरूड, श्रीवर्धन, माणगाव, तळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होत असल्याने मला खर्‍या अर्थाने आनंद वाटत आहे.
रोह्यातील रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग, भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे विशेष आभार व्यक्त करून येणार्‍या कालावधीत आरोग्य शिबिर, स्वच्छता शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply