ना. मुनगंटीवारांकडून राज ठाकरेंना खास गिफ्ट
चंद्रपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौर्यावर आहेत. या दौर्यानंतर त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज ऐकायला येणार आहे, कारण चंद्रपूर येथे आलेल्या आलेल्या राज यांना भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक खास गिफ्ट दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकू येणारी एक खास भेटवस्तू मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या ‘शिवतीर्थ’वर आता पंतप्रधान मोदींचा आवाज ऐकायला येणार आहे. ना. मुनगंटीवार यांच्याकडून राज यांना सदिच्छा भेट म्हणून एक स्केच आणि एक पत्र फ्रेम करून देण्यात आले आहे. त्यासोबत राष्ट्रध्वजाचे सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. या सन्मानचिन्हामध्ये पंतप्रधान मोदींचे एक रेकॉर्डेड घोषणा ऐकू येत आहे. वंदे मातरम् अशी ती घोषणा आहे. त्यानंतर त्यात वंदे मातरम गाणेदेखील ऐकायला येणार आहे.