Breaking News

महिलेच्या गळ्यातील गंठण लांबवली

कर्जत तालुक्यातील शेलू गावातील घटना

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शेलू गावात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी 50 वर्षीय महिलेच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे सोन्याचे गंठण खेचून पोबारा केला.  या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेरळ येथे राहणार्‍या सुनिता परशुराम धुळे (वय 50) या शेलू गावात लहान नातीसह गेल्या होत्या. शेलू रेल्वे स्थानक ते ग्रामपंचायत कार्यालय या रस्त्यावर तोंडाला रुमाल व डोक्यात टोपी घालून उभा असणार्‍या अज्ञात व्यक्तीने सुनिता यांच्या गळ्यातील सोन्याची गंठण खेचून दुचाकीवरून पोबारा केला. घाबरलेल्या सुनिता यांनी आरडाओरड करत त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु परिसरातील ग्रामस्थ बाहेर येईपर्यंत सोनसाखळी चोर फरार झाले होते.

सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून चोरट्यांनी वापरलेली दुचाकी शेलू रेल्वे स्थानक परिसरात पार्क केल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. नेरळ पोलिसांनी चोरट्यांनी वापरलेली दुचाकी ताब्यात घेतली असून, दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply