लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
जेईई परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालय बारावी विज्ञान 1मध्ये शिकत असलेला आदित्य आनंद कुलकर्णी हा 97.72 पर्सेंटाइल मिळवून यशस्वी झाला व अॅडव्हान्स परिक्षेकरिता पात्र ठरला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदित्यचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, प्राचार्य प्रशांत मोरे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, तसेच आनंद कुलकर्णी उपस्थित होते. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, माध्यमिक विभाग पर्यवेक्षिका स्वाती पाटील, अजित सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनीही आदित्यचे अभिनंदन केले.
आदित्य हा सीकेटी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आनंद कुलकर्णी व अंजली कुलकर्णी यांचा सुपुत्र आहे.