Breaking News

कॉफी टेबल बूकचे कोकण विभागीय माहिती उपसंचालकांकडून कौतुक

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या समग्र रायगड- पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण या कॉफीटेबल बुकचे मंगळवारी (दि. 18) विभागीय माहिती कार्यालयात घेण्यात आलेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कॉफीटेबल बुकचे सोमवारी प्रकाशन झाले. कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी या कॉफीटेबल बुकचे विशेष कौतुक करीत जिल्हा माहती अधिकारी मनोज सानप आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले. या वेळी रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पालघर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, ठाणे जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे आणि कोकण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. डॉ. गणेश मुळे यांनी या वेळी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना
दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply