पर्थ : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी (दि. 30) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. संघाने सलग दोन सामने जिंकल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबल वाढले आहे.
सुपर 12च्या ग्रुप-2मध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करून गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थान पटकाविले आहे, तर दक्षिण आफ्रिका दोन सामन्यांत तीन गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. आफ्रिकेने मागील सामन्यात बांगलादेशचा पराभव केला, मात्र झिम्बाब्वेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाहून गेला होता.
पर्थमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळ साडेचार वाजता सुरू होईल. वेदरडॉटकॉमनुसार रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून
पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही. रात्री नऊनंतर दोन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पर्थमधील तापमान 13 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. त्यामुळे दोन्ही संघ कडाक्याच्या थंडीत सामने खेळतील.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, दीपक हुडा.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, अॅनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, हेनरिक क्लासेन, तबरेझ शम्सी, रीझा हेंड्रिक्स, मार्को हेंड्रिक्स, मार्को यानसेन.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …