Breaking News

मुरूडमध्ये गौरी गणपतीला निरोप

मुरूड : प्रतिनिधी

एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला अशा घोषणांत मुरूड तालुक्यातील गणेशभक्तांनी मंगळवारी (दि. 14) गौरीगणपतीला निरोप दिला.

गेल्या पाच दिवसांपासून सकारात्मक ऊर्जा व आनंद देणार्‍या गणरायाला निरोप देताना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते.  मंगलमय वातावरणात मुरूड तालुक्यातील गणपतींचा विसर्जन सोहळा पार पडला. मंगळवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून गणपती विसर्जनासाठी मुरूड समुद्रकिनारी आण्यास सुरुवात झाली होती. या वेळी मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2257 गणपती व 350 गौरींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी नगर परिषदेकडून दिवे लावण्यात आले होते. गणेशमूर्ती विसर्जन करण्याकरिता जीवरक्षक तैनात  करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply