पोलादपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने पोलादपूर येथील श्री सदस्यांनी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार रविवारी (दि. 27) सकाळी पोलादपुरातील श्री समर्थ बैठक हॉल परिसर ते रिक्षा स्थानक या दोन किमी रस्त्याची दुतर्फा स्वच्छता मोहीम राबविली. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आगामी काळातदेखील प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी स्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याची माहिती पोलादपूर येथील श्री सदस्यांनी दिली. पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी व राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी पोलादपूर शहरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत 58 श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी 200 किलो सुका कचरा व 300 किलो ओला कचरा गोळा केला व त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.