अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील नारंगी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रतिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अनिता संदेश म्हात्रे, रूपाली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सतिश लेले, संतोष पाटील, जान्हवी पारेख, निखिल चव्हाण, अशोक नानची, शैलेश नाईक, पंकज अंजारा, मितेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते.