Breaking News

राष्ट्रीय वक्तृत्व कार्यक्रमात ‘सीकेटी’ची प्रिया चौधरी चमकली

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रिया चौधरी हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत संसदेत उत्कृष्ट भाषण केले व आपल्या वक्तृत्व शैलीने छाप सोडली. तिने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, प्राध्यापक एस. एन. तरकाळे उपस्थित होते.
दिल्ली येथे संसद सचिवालयाकडून राष्ट्रीय नेत्यांना पुष्पांजली या राष्ट्रीय वक्तृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने एनएसएस विभागाकडून देशभरातील 25 प्रतिनिधींची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्रिया शेषनाथ चौधरी हिची महाराष्ट्राची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. प्रिया चौधरी हिने अनेक जिल्हा व राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत सहभाग घेऊन यश प्राप्त केले आहे. त्यानुसार संसद सचिवालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तिला आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी तिने महाराष्ट्राचे नेतृत्व करत आपल्या वक्तृत्वातून उपस्थितांची मने जिंकली.
अत्यंत समर्पक मांडणी सादर करून आपल्या भाषणातून तिने राष्ट्रीय नेत्यांना पुष्पांजली अर्पण केली. तिच्या बहारदार वक्तृत्वाबद्दल सर्वांनी भरभरून कौतुक केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply