Breaking News

गावदेवी कालभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांचे मार्गदर्शन

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडी विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली आहे. गावदेवी कालभैरव विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी (दि. 13) कालभैरव मंदिरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपल्यासह गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडीचे 13 उमेदवार विजयी होतील, असा विश्वास या वेळी सरपंच पदाच्या उमेदवार शलाका विजय पाटील यांनी व्यक्त केला. पेण तालुक्यात 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबरला होत आहेत. त्यापैकी दादर ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडी विरोधात महाविकास आघाडी असा थेट सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडीने सरपंच पदासाठी शलाका विजय पाटील यांना उमेदवारी देऊन महाविकास आघाडी समोर आव्हान उभे केले आहे. गावदेवी कालभैरव ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, मागील पाच वर्षात दादर गावात विकासाची गंगा आली आहे, हे सर्व श्रेय माजी सरपंच विजय पाटील यांचे आहे. भाजपने आमदार रवीशेठ पाटील त्याच्या मागे ताकद उभी करून दादर गावातील तलावाचे सुशोभीकरण, पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते आदी विकासकामे केली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत गावदेवी कालभैरव ग्राम विकास आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील. या वेळी गावदेवी कालभैरव ग्राम विकास आघाडी तर्फे दादर गावात प्रचारफेरी काढण्यात आली होती. देश व राज्यात भाजपचे सरकार आहे. आमदार रवीशेठ पाटील व वैकुंठ पाटील यांच्यामुळे विकासकामांबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. भाजप सदैव दादर गावाचा विकास करणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील यांनी प्रचारफेरीला मार्गदर्शन करताना दिली. पेण पंचायत समितीचे माजी सभापती नाशिकेत पाटील, गजानन म्हात्रे, माजी सरपंच मोहन नाईक, एकनाथ पाटील, गोरख पाटील, धनाजी पाटील, देवजी पाटील, चंद्रकांत पाटील, भालचंद्र पाटील, तुकाराम म्हात्रे, भगवान पाटील, अ‍ॅड. स्वागत पाटील, मोहन पाटील, गजानन पाटील, समाधान पाटील, मच्छिंद्र गुरूजी, गोरखनाथ पाटील, एन. जे. ठाकूर, सुरेश एकनाथ पाटील, भाऊसाहेब पाटील, हरिश्चंद्र पाटील, गजानन पाटील यांच्यासह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply