Breaking News

रोह्यात अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला मध्यरात्री अटक

रोहे ः प्रतिनिधी
उदरनिर्वाहासाठी रोह्यात आलेल्या एका कुटुंबातील 11 वर्षीय गतिमंद मुलीवर 55 वर्षीय आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अष्टमी येथे समोर आली आहे. या घटनेची वेळीच दखल न घेतल्याने नागरिकांनी एकत्र येत रोहा पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला. त्यानंतर अखेर आरोपीविरोधात शनिवारी मध्यरात्री तब्बल आठ दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन गतिमंद मुलीवर 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 11.30च्या नराधमाने अत्याचार केला. आपली मुलगी आरोपीच्या सोबत दिसल्याने आईला संशय आला आणि तिने मुलीकडून माहिती घेतला असता, ही मुलगी गतिमंद व एकटी असल्याचा फायदा घेऊन त्या इसमाने तिला शाळेच्या खोलीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. गंभीर बाब म्हणजे या कुटुंबावर दबाव येत होता. मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिची आई न्यायासाठी धडपडू लागली. ही घटना कळताच रोहेकर नागरिकांनी एकत्र येत व या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहात पोलीस ठाण्यात विचारणा केली.
या वेळी रोह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेतेगण, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घेत ही धक्कादायक बाब पोलिसांच्या लक्षात आणून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा वेळ का लावला, असा सवाल केला, तसेच पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली.
पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत कार्यवाही केली. आरोपीला रात्री उशिरा अटक झाली असून, त्याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 354, 354 अ(1) (2) 354 ब सह पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी सोनाली कदम अधिक तपास करीत आहेत.
या प्रकाराची रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दखल घेतल्यानंतर रोहा पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला, परंतु गेल्या आठ दिवसांत आरोपीच्या विरोधात गुन्हा का दाखल झाला नाही? त्यासाठी कोणाचा दबाव होता का? घटना माहीत झाल्यावर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी का करण्यात आली नाही, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply