Breaking News

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार

नरेंद्र पाटील यांची राज्य सरकारला तंबी

सोलापूर ः प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही लढून केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु महाविकास आघाडी सरकारला झुकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आरक्षणासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्यात येतील, अशी तंबी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (दि. 12) सोलापुरात राज्य सरकारला दिली.  
मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शनिवारी मराठा क्रांती संघर्ष मोर्चासंदर्भात अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, शहाजी पवार, अनंत जाधव, इंद्रजित पवार, किरण पवार, राम जाधव, अजिंक्य पाटील, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, शाम कदम यांच्यासह समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती.
मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधानांना भेटायला गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती उदयनराजे यांना का घेऊन गेले नाहीत, असा सवालही नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री फक्त मराठा आरक्षणासाठी नव्हे, तर इतर 12 प्रकरणे घेऊन पंतप्रधानांना भेटायला गेले. यावरूनच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडी किती सकारात्मक आहे हे दिसते. राज्य सरकारने नेमलेल्या आयोगात एकाही मराठा समाजाच्या व्यक्तीचा समावेश नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply