काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम 370, 31 अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 1990 दरम्यान काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर या समुदायाने कठीण परिस्थितीला तोंड दिले. आपले घरदार सर्वस्वी काश्मीरमध्ये असून देखील या सर्वांना त्या पासून मुकावे लागले आहे. केंद्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार या सर्वांना आपल्या मातृभूमीत परतण्याची संधी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत काश्मीरी पंडित समुदाय करीत आहे.
आमच्या मायभूमीत आम्हाला परतण्याची संधी शासनाने दिली पाहिजे. याकरिता काश्मीर मध्येच एक स्वातंत्र्य काश्मीर पंडित वसाहत उभारण्याची गरज आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी देखील केंद्र सरकारने हाती घेण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये काश्मीर पंडितांसह डोग्राम, हिंदू, महाजन, शीख आदी अल्पसंख्याक समाज देखील वास्तव्यास होते. मात्र मुस्लिमांसाठी सर्वांनाच येथील घरे, जागा सोडण्यास भाग पाडले, असल्याचे चांद भट यांनी सांगितले. आमचे आजही काश्मिरी मुस्लिमांशी सलोख्याचे संबंध आहेत. मात्र त्यांना मुस्लिमा शिवाय कोणाचेच वास्तव्य नको आहे.
काश्मिरी पंडित काश्मीरचे खरे मालक
काश्मीरमध्ये सुशिक्षित व समृद्ध म्हणून काश्मीर कुटुंब ओळखले जात होते. शेकडो हेक्टर बागा, शेतजमीन या काश्मिरी पंडितांच्या नावावर होत्या. मात्र स्थानिक मुस्लिमांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काश्मिरी पंडितांवर अन्याय करून त्यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले, असे चमनलाल रैना यांनी सांगितले.