खंडणीप्रकरणी नागाव सरपंचाविरूद्ध गुन्हा दाखल
अलिबाग ः प्रतिनिधी
रिसॉर्ट नावावर करून देण्यासाठी रिसॉर्ट मालकाकडे 10 लाख रुपये मागितल्याप्रकरणी अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचयातीचे सरपंच निखिल मयेकर व त्यांचे वडील माजी सरपंच नंकुमार मयेकर यांच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथे राहणारे अशोक प्रभाकर मस्तकर (वय 78) यांनी नागाव ग्रामपंचयातीच्या हद्दीत सर्वे नं. 241 (5)वर रिसॉर्ट खरेदी केले आहे. त्याची अॅसेसमेंट अशोक मस्तकर यांंच्या नावावर करायची होती. ती करण्यासाठी निखील मयेकर व नंदकुमार मयेकर यांनी मस्तकर यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. 10 लाख रुपये दिले नाहीत, तर रिसॉर्ट नावावर करणार नाही, अशी धमकीही मयेकर पिता-पुत्रांनी दिली, तसेच या रिसॉर्टसमोर कोणतेही अतिक्रमण नसताना अतिक्रमण काढण्याकरिता प्रतिज्ञापत्र देण्याबाबत दबाव आणला. याबाबत अशोक मस्तकर यांनी अलिबाग पोलीस ठण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार निखील मयेकर व नंदकुमार मयेकर यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 385, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव याप्रकरणी तपास करीत आहेत.