मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांच्या शिवसेना युतीकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते या निवडणुकीत विजयी होतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि. 9) व्यक्त केला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या पत्रकार परिषदेस बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजप नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. युतीतर्फे या मतदारसंघासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या वेळी केली. या निवडणुकीत म्हात्रे यांची वाटचाल विजयाच्या दिशेने सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक हरेश केणी व अन्य मान्यवर समवेत होते.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …