सुधागड : रामप्रहर वृत्त
पाली-खोपोली राज्य महामार्गावरील हेदवली गावानजीक असलेल्या टॉपर कंपनीजवळ मंगळवारी (दि. 3)संध्याकाळी रुग्णवाहिका आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिका (एमएच-04, जीपी-504) पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होती, तर दशरथ दत्तू पवार (35) आपल्या दुचाकी (एमएच-19,बीबी-8621)वरून खोपोलीकडून पालीच्या दिशेने येत होते. टॉपर कंपनीजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात दुचाकीस्वार दशरथ पवार यांच्या पोटाला व पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी आलिबाग येथे हलवण्यात आले आहे. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जांभूळपाडा पोलीस दूरक्षेत्र येथे या अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.