मोहोपाडा : प्रतिनिधी
वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन व मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने पंच परीक्षा व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पनवेलमधील खेळाडू आणि पंचांनी यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती व इंडियाच्या चेअरमन संयोगिता छत्रपती उपस्थित होते. मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे दिलीपकुमार सिंग, संतोष खंदारे, प्रशांत मोहिते आदी उपस्थित होते.
पंच परीक्षा व स्पर्धेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, उत्तर प्रदेश, पाँडिचेरी, गोवा, दादरा आणि नगर हवेली, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, आणि महाराष्ट्र अशा 15 राज्यांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील शैलेश ठाकूर, अक्षय जाधव, विशाल झेंडे, श्रेया कटके, मानसी भाबल, सानिका ठाकूर, दिव्या पाटील, रिताशा सुर्वे, पियुष धायगुडे, आकांक्षा ठोकळे हे पंच परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले, तर श्रेया कटके, रिताशा सुर्वे, पियुष धायगुडे, यश कोरडे यांनी सुवर्णपदक, दिव्या पाटील, आकांक्षा ठोकळे, वैभव खराडे यांनी रौप्य पदक आणि सानिका ठाकूर, आशय बागडे, रोहन बोराटे यांनी कांस्यपदक जिंकले.
Check Also
करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …