Breaking News

मिनीडोर संघटनेची क्रिकेट स्पर्धा रंगली

रेवदंडा : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही रेवदंडा, चणेरा, चौल, नागाव, वावे या संकल्प सिद्धी मिनिडोर इको संघटनेच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चौल हिंगुळजा देवी मैदानात नुकतेच झाले. या स्पधेर्र्त महेश मानकर संघाने बाजी मारली.
स्पर्धेचा शुभारंभ माजी पं.स.सदस्य उदय काठे, संकल्प सिद्धी मिनिडोर संघटनेचे अध्यक्ष आदेश मोरे, खजिनदार संतोष म्हात्रे, सुनील टेकाळकर, माजी अध्यक्ष नितीन पराड यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत एकूण
आठ संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना महेश मानकर विरुद्ध रितेश ठाकूर या संघांत खेळविण्यात आला. यामध्ये महेश मानकर संघ विजेता ठरला. तृतीय क्रमांक आशिष तोडणकर यांच्या संघाने मिळविला.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply