पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल ः महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयाजवळ बँड व फटाके वाजवून, पेढे वाटून, नाचून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निवडणुकीसाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे या वेळी सर्वांनी अभिनंदन केले.
या जल्लोषात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, मनोज भुजबळ, अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, राजू सोनी, माजी नगरसेविका सुशीला घरत, नीता माळी, राजेश्री वावेकर, रूचिता लोंढे, वृषाली वाघमारे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी. पाटील, संजय भगत, मधुकर उरणकर, मुनावर पटेल, अमरीश मोकल, अभिषेक पटवर्धन, वासुदेव पाटील, हारूशेठ कोळी, रोहित जगताप, प्रसाद हनुमंते, अभिषेक भोपी, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, प्रीतम म्हात्रे, विशाल म्हसकर, रूपेश नागवेकर, प्रवीण मोहोकर, भीमराव पोवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या वेळी भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतीय जनता पक्षाचा विजय असो, आमदार प्रशांत ठाकूर आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा गगनभेदी घोषणा देत व जयघोष करीत किमयागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मेहनतीचा गौरव करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर तीन वेळा आमदार झाले, मात्र त्यांनी कधीही डोक्यात हवा जाऊन दिली नाही आणि उतमात केला नाही, पण बाळाराम पाटलांनी आमदार झाल्यावर उतमात व मनमानी कारभार केला. त्या मुजोरीला कंटाळून सुज्ज्ञ मतदारांनी त्यांना धूळ चारली. या विजयात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांचा मोठा वाटा आहे. येणार्या सर्व निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे.
-अरुणशेठ भगत, भाजप तालुकाध्यक्ष, पनवेल