Breaking News

खोपोलीत दुकाने फोडून चोरी करणार्‍या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

खालापूर : प्रतिनिधी

खोपोली शिळफाटा येथे झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने दोन चोरट्यांना जेरबंद केले असून, यापैकी विकास कांबळे याच्यावर पुण्यात चोरी, घरफोडी, वाहनचोरीचे 37 गुन्हे दाखल असून, 11 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तो ‘वाँटेड’ आहे. या चोरांकडून खोपोलीतील दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून दोन मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्या आहेत. खोपोली शिळफाटा येथील अजय वाईन्स या शॉपमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचून गणेश सचिन जमदाडे (वय 19, रा. बौध्दनगर, पिंपरी, जि. पुणे) याला मोटारसायकलसह ताब्यात घेेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून खोपोली पोलिसांनी त्याचा साथिदार विकास दिलीप कांबळे (वय 27, रा. बौध्दनगर,  पिंपरी, जि. पुणे) याच्याही मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून अ‍ॅक्सेस मोटारसायकल (एमएच-14,इके-5873) हस्तगत करण्यात आली. तसेच चिंचवड पोलीस ठाणे हद्दीतून चोरण्यात आलेली बजाज पल्सर मोटारसायकल (एमएच-14,जेएफ-7382) ताब्यात घेण्यात आली आहे.  विकास कांबळे हा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील 11 पोलीस ठाण्यांतील विविध गुन्ह्यांतील ‘वाँटेड’ आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी  चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीचे एकूण 37 गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या सुचनेप्रमाणे आणि खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला व वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली  उपनिरीक्षक अमोल वळसंग, सहायक  उपनिरीक्षक श्रीरंग किसवे, हवालदार राजेंद्र पाटील, दिनेश गायकवाड,  प्रविण भालेराव, प्रदिप खरात, सतिश बांगर, कादर तांबोळी तसेच सायबर सेलचे पोलीस अंमलदार अक्षय पाटील, तुषार घरत यांनी ही कामगिरी केली आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply